खान्देश न्यूज–(विशेष प्रतिनिधी)–
आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय पातळीवरील झालेल्या बैठकीमधील चर्चेनुसार दिवाळीपूर्वी भाऊबीज आणि मानधन वाढीचा शासकीय आदेश(GR) काढावा.यासाठी दि. ०८.११.२०२३ रोजी आझाद मैदान मुंबई येथे राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांचा ओवाळणी मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
तरी राज्यातील सर्व आशा भगिनी आणि गटप्रवर्तक यांनी मोठया संख्येने आझाद मैदान मुंबई येथील ओवाळणी मोर्चात ओवाळणीच्या साहित्यासह ( ताट,निरंजन आदी ) भागिदारी करुन मोर्चा यशस्वी करावा ,असे आवाहन श्रीमती. माया परमेश्वर, श्री. युवराज बैसाणे, श्री. रामकृष्ण पाटील, श्री. दत्ता जगताप, श्री. सुमंत कदम, श्री. सुधीर परमेश्वर, श्री. अमोल बैसाणे सर्व संघटना पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केले आहे.