कुऱ्हाड ता पाचोरा–प्रतिनिधी(सुनिल लोहार)
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड या महसूल मंडळात पदवीधर मतदार नोंदणी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
येथील ग्रामपंचायत सभागृहामध्ये कुऱ्हाड मंडळ अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये जसे लोहारा, रामेश्र्वर, कासमपुरा, शहापुरा,सर्वे प्र.लो, जामने,लाख, कळमसरा,कुऱ्हाड खुर्द कुऱ्हाड बुद्रुक ,व म्हसास या सजा अंतर्गत येणाऱ्या कुऱ्हाड मंडळात त्या त्या गावांचे सरपंच,पोलिस पाटिल,राजकीय ,प्रतिष्ठित लोकांच्या उपस्थित जे नागरिक २०१९चे आत पदवीधर झालेले असतील. त्यांची नाशिक पदवीधर मतदार संघात नव्याने यादीत नाव समाविष्ट करण्याची मोहीम शासनातर्फे १ऑक्टोबर ते ७नोव्हेंबर पर्यंत राबविण्यात येत आहे.त्या करिता पात्र नागरिकांनी लवकरात लवकर आपली नावे समाविष्ट करून घ्यावी,असे आवाहन मंडळ अधिकारी प्रकाश डहाके व तलाठी प्रवीण पवार यांनी केले आहे.
कार्यक्रमास कुऱ्हाड खुर्द सरपंच संगीता कैलास भगत, ग्रामसेवक रमेश महाजन,पोलीस पाटील संतोष सोनवणे, लोहारा सरपंच अक्षय जैस्वाल,पोलीस पाटील सुरेंद्र शेळके, जामने पोलीस पाटील समाधान पाटील, सारवे पोलीस पाटील रामकृष्ण पाटील ,कोतवाल मल्हारी दुधे व रवी चव्हाण,ग्राम पंचायत कर्मचारी अशोक बोरसे,बाबुलाल चौधरी व आदी गावांचे सरपंच,पोलिस पाटील,प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.