लोहारा ता पाचोरा—प्रतिनिधी--येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीराम मंदिरात राज्याचे ग्रामविकास, पंचायत राज व पर्यटन मंत्री यांच्या माध्यमातून ३५ लाख रुपये खर्चून भव्य सभामंडप होणार असून या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी जामनेर नगरीच्या लोकप्रिय नगराध्यक्षा साधना महाजन, ज्येष्ठ भाजपा नेते जे.के.चव्हाण ,लोहारा कुऱ्हाड सर्कलचे पालक पदाधिकारी सुहास पाटील ,सार्वे जामने माजी सरपंच संजय पाटील यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडून सभामंडपाचे भूमिपूजन करण्यात आले. श्रीराम मंदिरात सभामंडप व्हावे अशी अनेक दिवसांपासूनची भाजपा कार्यकर्ते,भाविक व मंदिर समितीची मागणी होती. या मागणीचा पाठपुरावा ग्रामपंचायत सदस्य कैलास चौधरी, शरद सोनार यांनी ना.गिरीष महाजन यांचेकडे वेळोवेळी केल्याने ना.महाजन यांनी ३५ लाख रुपयांचा निधी सभामंडप साठी उपलब्ध करून दिल्याने मंदिर समिती,भाविक यांनी ना.महाजन व भाजपा कार्यकर्ते यांचे आभार व्यक्त केले आहे.
यावेळी साधना महाजन यांनी श्रीराम मंदिरात प्रभू श्रीराम यांचे दर्शन घेतले. यावेळी श्रीराम मंदिर समितीतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.तर उपस्थित जे के चव्हाण, सुहास पाटील,संजय शांताराम पाटील,डॉ.केयुर चौधरी, बांधकाम विभागाचे उप अभियंता वाडीले,भाऊसाहेब कुमावत यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक कैलास चौधरी यांनी केले.यावेळी ज्येष्ठ भाजपा कार्यकर्ते जे के चव्हाण यांनी लोहारा व परिसरातील गावांसाठी ना.महाजन यांनी मंजूर केलेल्या कामांची माहिती दिली. व ना.गिरीष महाजन हे जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र झटणारे व्यक्तिमत्त्व असून त्यांची नाळ थेट जनतेशी जुळली आहे,असे व्यक्तीमत्व आपल्या मतदारसंघाचा लाभले असल्याने ते आपले भाग्य आहे असे सांगितले.
यावेळी पंचायत समिती उपसभापती अनिता चौधरी, माजी सरपंच मालती पाटील,ज्येष्ठ कार्यकर्ते शरद सोनार, ग्रामपंचायत सदस्य कैलास चौधरी, उपसरपंच दिपक खरे, संभाजी चौधरी, शेख हसन साहेबलाल ,राजू गिते,शरद कोळी,सुनिल खरे, विकासो चेअरमन सुनिल क्षिरसागर, कृष्णा भिवसने ,नंदू सुर्वे ,दत्तात्रय भोसांडे, डॉ.बरकले,सुरेश पाटील,ज्येष्ठ नागरिक संघाचे भास्कर अंबिकार,प्रभाकर चौधरी, राहुल कटारिया, शांताराम चौधरी,रविंद्र कलाल, सुभाष चौधरी, मधुकर चौधरी, वासुदेव सरोदे ,महेंद्र घोंगडे,अश्लेष घोंगडे,अतुल कोळी,प्रविण चौधरी, भास्कर भोई,चंद्रकांत पाटील,रमेश शेळके,रमेश लिंगायत,संजय पाटील,कैलास कुमावत यांसह गावातील सर्व स्तरातील समाज बांधव व श्रीराम मंदिर समिती तथा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिपक पवार यांनी केले तर आभार कैलास चौधरी यांनी मानले.या विकास कामांचे भूमिपूजन निमित्त लोहारा गावातील ग्रामस्थांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला.