लोहारा तालुका पाचोरा प्रतिनिधी— येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ५००वर्षे प्राचीन व हेमाडपंथी तपेश्वर मंदिरास पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत ग्रामविकास व पर्यटन मंत्री ना.गिरीष महाजन यांच्या माध्यमातून ज्येष्ठ नेते जे के चव्हाण,जितेंद्र पाटील, लोहारा गटाचे पालक पदाधिकारी सुहास पाटील यांच्या मार्गर्शनाखाली भाजपा युवा ग्रामपंचायत सदस्य कैलास चौधरी यांच्या मागणी व पाठपुराव्याने ना.गिरीष महाजन यांनी अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर करीत ११ मार्च रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली. याबद्दल तपेश्वर मंदिर समिती,ग्रामस्थांनी गिरीष महाजन यांचे आभार मानले आहेत.
तपेश्वर मंदिर चे सुशोभीकरण व विकास व्हावा ही ग्रामस्थ व भाविकांची अनेक दिवसांची मागणी लक्षात घेता ग्रामपंचायत सदस्य कैलास चौधरी यांनी नामदार गिरीश महाजन यांना दिनांक १०ऑगस्ट २०२३रोजी पत्र देऊन मागणी केली होती व भाजपा ज्येष्ठ नेते जे.के चव्हाण ,गट पालक सुहास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कैलास चौधरी यांनी गिरीश महाजन यांच्या कडे पाठपुरावा केलेला होता. या कामाला अखेर दिनांक ११ मार्च रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. नामदार गिरीश महाजन यांनी अडीच कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानत लोहारा तपेश्वर मंदिर समिती,ग्रामस्थ व भाविकांनी आनंद व्यक्त केला आहे.