लोहारा ता पाचोरा– प्रतिनिधी–
धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन सोसायटी द्वारा विद्यालयात २०डिसेंबर रोजी कै. आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी संस्थेचे ज्येष्ठ संचालक व स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष भिमराव शेळके हे होते. यावेळी लोहारा उपसरपंच दीपक खरे, विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक आर एस परदेशी, डॉ देवेंद्र शेळके,डिगंबर चौधरी ,श्रावण नामदेव पाटील ,अहमद तडवी ,पी व्ही जोशी ,विकास देशमुख,भारत पाटील,दत्तू राठोड ,शरद देशमुख , उत्तम शेळके,पोलीस पाटील सुरेंद्र शेळके,ज्ञानेश्वर पाटील ,युवराज पाटील, हेमंत गुरव,चंद्रकांत पाटील, रमेश शेळके ,दीपक पवार ,दिलीप चौधरी ,डॉ प्राध्यापक अतुल सूर्यवंशी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस टी चिंचोले,विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका यु डी शेळके ,पर्यवेक्षक व्ही एम शिरपुरे यांच्या हस्ते सरस्वती सरस्वती माता सदगुरु हरिप्रसाद महाराज, कै आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड ,संत गाडगेबाबा, अण्णासाहेब भास्करराव गरुड यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यालयातील विद्यार्थिनी इशस्तवन सादर केले त्यानंतर कै आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड यांच्या स्मृती प्रित्यर्थ इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आंतरशालेय वकृत्व स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.यात विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला .तत्पूर्वी १९तारखेला आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विद्यालयात इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी वकृत्व स्पर्धा घेण्यात आलेली होती. त्यात विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आंतर शालेय वकृत्व स्पर्धेत प्रथमेश पुरुषोत्तम सुर्वे या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक मिळवला.द्वितीय क्रमांक वैष्णवी भारत पाटील,तृतीय क्रमांक मिताली संदीप काळे,उत्तेजनार्थ बक्षीस सुजाता अर्जुन देशमुख. प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला प्रमाणपत्र ट्रॉफी व ७०१रुपयांचं बक्षीस देण्यात आले. द्वितीय क्रमांक मिळवणारा विद्यार्थ्याला प्रमाणपत्र ट्रॉफी व ५०१ रुपयांचे बक्षीस देण्यात आले तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला २०१रुपयाचे बक्षीस व ट्रॉफी देण्यात आले.
या कार्यक्रमासाठी परिक्षक म्हणून माजी मुख्याध्यापक व्ही के चौधरी व ए टी चौधरी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक एस टी चिंचोले यांनी केले.व बापूसाहेबांच्या जीवनाविषयी माहिती दिली. शिक्षकांमधून श्रीमती एस व्ही पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर आलेल्या मान्यवरांमधून परीक्षक ए टी चौधरी यांनी आपले मनोगत पर भाषण केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष भिमराव शेळके यांनी आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड यांच्या स्मृतींना उजाळा दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी एन पाटील यांनी केले व आभार विद्यालयाचे पर्यवेक्षक व्ही एम शिरपुरे यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.