लोहारा तालुका पाचोरा—-येथील ग्रामपंचायत कार्यालयात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन शेंदुर्णी नगरसेवक निलेश थोरात, सतीश बारी, ग्रामपंचायत सदस्य कैलास चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रभारी सरपंच तथा उपसरपंच दीपक खरे, ग्रामपंचायत सदस्य संभाजी चौधरी, सुरेश चौधरी, महेंद्र शेळके, संजय पाटील,राहुल गीते,राजू गीते, अनिल तडवी, माळी समाजाचे अध्यक्ष कृष्णा भिवसने, प्रवीण चौधरी ,भास्कर भोई, अतुल कोळी ,मनोज भोसांडे,अमित खरे ,महेंद्र घोंगडे,विकास देशमुख दिव्यांग एकता बहुउद्देशीय संस्थेचे विकास शिवदे, सुरेश पाटील, विठ्ठल शेळके ,दत्तात्रय भोसांडे ,विशाल पवार, क्लार्क रवींद्र पाटील,सुभाष बाविस्कर,संतोष भिल, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनील खरे,दिपक पवार,दिलीप चौधरी,रमेश शेळके, सुभाष चौधरी,भाजपा कार्यकर्ते, दीव्यांग संस्थेचे सदस्य , शिवप्रेमी,नागरिक पत्रकार उपस्थित होते.