जळगाव—वेब मिडिया असोसिएशनचे प्रदेशाध्यक्षअनिल महाजन यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे झालेल्या बैठकीत सचिव गणेश पुजारी यांनी नुकतीच कार्यकारीणीची पहिली यादी जाहीर केली.
महाराष्ट्रात पहिली वेब मिडीया असोसिएशन ही रजिस्टर असोसिएशन असून वेब असोसिएशनचे अध्यक्ष अनिल महाजन हे वेब पोर्टल च्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर पत्रकारांचे संघटन करणार असून पोर्टलला एक वेगळे स्थान निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
नुकतेच वेब मिडीया असोसिएशनची पहिली१७ जणांची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली .त्यात प्रदेश उपाध्यक्षपदी सुधाकर राजे,पुणे (शासननामा ),विशाल सिंग,ठाणे (ठाणे पोलीस महानगर ),सुनील पाटील,मुंबई (बुलंद पोलीस टाइम्स ),प्रदेश सचिव प्रमोद परदेशी, पुणे (शासननामा ),प्रदेश सहसचिव दीपक बसवाल,मुंबई (सेलेब्रिटी टाइम्स ) कार्यकारिणी प्रदेश सदस्य फानुस सय्यद,मुंबई (रिअल न्यूज ऑफ इंडिया ),योगेश पाटील,जळगाव (झेप इंडिया ),अब्दुल शेख ठाणे (डिस्कव्हरी टाइम्स ),खानदेश विभागीय संघटक संभाजी देवरे,जळगाव(लोक न्यूज),जळगाव जिल्हा सचिव गणेश शिंदे ,पाचोरा (समृद्ध महाराष्ट्र),पारोळा तालुका अध्यक्ष बाळू पाटील (झेप इंडिया ),अमळनेर तालुका अध्यक्ष ईश्वर महाजन(मराठी लाइव्ह ),कार्यकारीणी सदस्य चेतन महाजन ,मुंबई (महाराष्ट्र
लाइव्ह ),नंदुरबार जिल्हाध्यक्ष शैलेंद्र चौधरी (जय मल्हार ),शिरूर तालुका अध्यक्ष घनश्याम तोडकर (एक धाडस न्यूज ),संघटक मुंबई अलका स्वामी(ब्राईट न्यूज),जालना जिल्हा संघटक दीपक सोनू (न्यूज२१ मराठी ) आदींची नियुक्ती करण्यात आली.