लोहारा ता पाचोरा—प्रतिनिधी–महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेल्या ओबीसी समाजाचे आरक्षण अबाधित ठेवणे करिता तसेच आवश्यक ईम्पिरिकल डाटा सुप्रीम कोर्टात सादर करून ओबीसी आरक्षणाचा स्थगिती आदेश रद्द करावा व केंद्र/राज्य सरकार द्वारा ओबीसींची जातिनिहाय जनगणना करून आरक्षणाचा कायदा संमत करावा व मंडल आयोग लागू करण्यात यावा यासाठी आज शुक्रवार दि. 2 जुलै रोजी महाराष्ट्रात लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे. त्याच पार्श्र्वभूमीवर आज पाचोरा येथे पाचोरा तैलिक महासभा व शहर तेली समाजाच्या वतीने निषेध नोंदवितांनाच प्रांताधिकारी मा.राजेंद्र कचरे यांना निवेदन देण्यात आले.यावेळी ओबीसी नेते अनिल महाजन ,पाचोरा तालुका अध्यक्ष श्री सतिष चौधरी,शहर उपाध्यक्ष शरद चौधरी,सचिव नारायण चौधरी,उत्तम चौधरी, सुवर्णकार समाजाचे विष्णू सोनार ,नंदकुमार सोनार ,प्रा. सी एन चौधरी,एस एस चौधरी ,छोटूलाल चौधरी ,विकास चौधरी, विरेंद्र चौधरी सुभाष चौधरी, दत्तात्रय चौधरी, प्रदीप चौधरी,
भालचंद्र चौधरी, संजय चौधरी, सुनील शिंदे , अनिल येवले शिवाजी चौधरी ,दिलीप चौधरी, जगन चौधरी, अरुण पाटील, आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.*