सुनील लोहार—- कुऱ्हाड प्रतिनिधी-—
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथील डॉक्टर तथा सामाजिक कार्यकर्ते प्रदीप महाजन व त्यांच्या पत्नी सुविद्य ग्रामपंचायत सदस्या सौ कविता महाजन या काल रात्री सोयगाव येथून भावाच्या घरून वैद्यकीय सेवा आटोपून घरी परत येत असताना रात्री साडे अकराच्या सुमारास त्यांचे चार चाकी वाहन कुऱ्हाड ते कळमसरा रस्त्यावर वाकडी पुलाखाली कोसळले परंतु वेळीच गाडीच्या एअरबॅग ताबडतोब उघडल्याने दोघ दाम्पत्याचा जीव बचावला. अपघात होताच मोठ्या धाडसाने त्यांनी गाडीचा उजव्या साईटचा दरवाजा खोलून दोघ बाहेर आलेत, या अपघातात त्यांना किरकोळ मार लागला. इतक्या रात्री त्यांनी गावात भ्रमणध्वनीवर संपर्क साधून ताबडतोब मदत मिळवली. नशीब बलवत्तर होते म्हणून या दोघांचा जीव बचावला. घटनास्थळी भीषण अपघात दिसत असलेले वाहन बघता काळ आला होता पण वेळ आली नव्हती असे चित्र दिसत होते.