लोहारा ता पाचोरा–विशेष प्रतिनिधी–(दिपक खरे)—पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुनीता वाघमारे यांना जळगाव येथील राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था यांच्यातर्फे सामाजिक शैक्षणिक पोलीस सेवा प्रशासन ग्रामसेवा व अन्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वाघमारे दाम्पत्य यांना “प्रेरणादायी दांपत्य पुरस्कार” जाहीर झाला आहे व या पुरस्काराचे वितरण १७सप्टेंबर रोजी अल्पबचत भवन ,जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे होणार आहे.
या वाघमारे दाम्पत्यांच्या कार्याची दखल घेऊन जळगांव येथील राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेने राज्यस्तरीय आदर्श प्रेरणादायी दांपत्य पुरस्कार २०२२-२३ हा पुरस्कार दोघांनाही जाहीर केला आहे.या पुरस्काराचे वितरण १७ सप्टेंबर रोजी अल्पबचत भवन,जिल्हाधिकारी कार्यालय ,जळगांव या ठिकाणी होणार आहे.