लोहारा ता पाचोरा— (महेंद्र शेळके)—येथील शिवसेनेचे युवा कार्यकर्ते तुषार कासार यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवासेना पाचोरा तालुका उपतालुकाप्रमुख पदी यांची नुकतीच नियुक्ती
करण्यात आली.
शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते व जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत, शिवसेना नेत्या वैशालीताई सूर्यवंशी,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दीपक राजपूत,डॉ.हर्षल माने,गुलाबराव वाघ,धरणगाव माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी,शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख अरुण पाटील या मान्यवरांच्या उपस्थितीत शिवसेनेचे युवा कार्यकर्ते तुषार पद्माकर कासार यांची युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) च्या पाचोरा तालुका उपतालुकाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.व संजय सावंत यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
तुषार कासार यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे लोहारा शिवसेना शाखा व युवा सेनेच्या वतीने अभिनंदन केले आहे.