लोहारा ता पाचोरा–(विशेष प्रतिनिधी)--. पिंपळगाव हरे पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांनी लोहारा येथील गणेशोत्सव मंडळाला भेटी दिल्या. व यावेळी येथील वीर भगतसिंग गणेशोत्सव मित्र मंडळाच्या श्री गणेशाची आरती पिंपळगाव हरे पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी वीर भगतसिंग मित्र मंडळाचे अध्यक्ष विशाल शेळके यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांचे शाल,टोपी देऊन सत्कार व स्वागत केले.यावेळी त्यांच्यासमवेत पत्रकार दिपक पवार, गजानन क्षीरसागर, निलेश चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल रणजित पाटील व कर्मचारी ,मंडळाचे सदस्य उपस्थित होते. तर माणुसकी समूहाचे जिल्हाध्यक्ष गजानन क्षीरसागर यांनी सपोनि महेंद्र वाघमारे यांना भगवदगीता भेट दिली.