लोहारा ग्रामपंचायतीवर बसणार प्रशासक !
लोहारा ता पाचोरा –प्रतिनिधी — येथील१७ सदस्यीय सदस्यसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीची मुदत १२ सप्टेंबर रोजी संपत आहे.मात्र हल्ली कोरोना महामारीचे भयावह संकट संपूर्ण देशासह महाराष्ट्रात आहे.त्यामुळे शासनाच्या आदेशानुसार तूर्त पंचवार्षिक निवडणुका घेणे शक्य नसल्याने मुदत संपणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींवर शासकीय अधिकारी,कर्मचारी यांची “ग्रामपंचायत प्रशासक” म्हणून नियुक्ती शासन करणार आहे. त्यामुळे लोहारा ग्रामपंचायतवर सुद्धा प्रशासक बसणार आहे.
१२ सप्टेंबर रोजी विद्यमान सरपंच,उपसरपंच व सदस्यांचा कार्यकाल संपणार आहे,त्यामुळे प्रशासक म्हणून कोणत्या अधिकारी अथवा कर्मचाऱ्याची नियुक्ती होते?याकडे लोहारा ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.