लोहारा ग्रामपंचायतीच्या “प्रशासकपदी गोकुळ कच्छवा (विस्तार अधिकारी ,कृषी ) यांची नियुक्ती …..!!!
लोहारा ता पाचोरा –प्रतिनिधी—येथील ग्रामपंचायतीच्या “प्रशासकपदी गोकुळ नथ्थू कच्छवा (विस्तार अधिकारी ,कृषी )यांची नियुक्ती केल्याचा आदेश डॉ.बी.एन.पाटील.,मुख्य कार्यकारी अधिकारी ,जिल्हा परिषद जळगाव यांनी काढला असून लोहारा ग्रामपंचायतीच्या कारभाराची सर्व सूत्रे आता त्यांच्या हाती असणार आहे.
गोकुळ कच्छवा हे लोहारा ग्रामपंचायतीसह ,कासमपुरा ,शहापुरा ग्रामपंचायतीचे प्रशासक म्हणून काम पाहणार आहेत.तर म्हसास ग्रामपंचायतीच्या प्रशासकपदी लोहारा केंद्राचे केंद्रप्रमुख बाबुराव धुंदाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.कळमसरा ग्रामपंचायतीच्या प्रशासक म्हणून आर एस धस (विस्तार अधिकारी,ग्रा.पं.)हे काम पाहणार आहेत.धस यांचेकडे कळमसरा ग्रामपंचायतीसह कुऱ्हाड बु,कुऱ्हाड खुर्द, सारोळा खुर्द आदी गावांची जबाबदारी असणार आहे.तर रामेश्वर ग्रामपंचायतीच्या प्रशासक म्हणून पर्यवेक्षिका एस एस पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
एकंदरीत लोहारा सह आजूबाजूच्या सर्व गावच्या ग्रामपंचायतीचा कार्यकाल संपल्याने व कोरोनाच्या महामारीने निवडणुका होणार नसल्याने ग्रामपंचायतीची पुढाऱ्यांच्या हातातील सूत्रे व सर्व कारभार आता प्रशासकाच्या हाती असणार आहे.