लोहारा भाजपातर्फे पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी
लोहारा ता पाचोरा—(दिपक पवार)—येथील भाजपा शाखेतर्फे भारतीय जनसंघाचे संस्थापक पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ विकासो संचालक भागवत माळी यांच्या हस्ते करण्यात आले.भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत महत्वाचा वाटा असणारे पंडित दीनदयाल उपाध्याय म्हणजे एक महान विचारवंत, पत्रकार, लेखक आणि समाजाला युगानुकुल दृष्टी देणारे महान तत्वज्ञ. होते ,अशा भावना यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते शरद सोनार ,उपसरपंच कैलास चौधरी यांनी व्यक्त केल्या.
यावेळी नमो फौंडेशनचे प्रदेश सचिव डॉ.केयूर चौधरी राजू महाजन ,विकासो संचालक उखा बाविस्कर ,सुरेश जाधव ,शिवाजी गोंधळे,सुनील क्षिरसागर,संतोष पालीवाल,राजू भदाणे ,चंद्रकांत पाटील,बाळू गुजर,शेनफडू कोळी,संभाजी चौधरी,पांडुरंग सरोदे,नंदू सुर्वे,प्रवीण चौधरी यांसह भाजपा कार्यकर्ते ,नागरिक उपस्थित होते.