लोहारा येथील मतिमंद युवकाचा नाल्यातील पाण्यात बुडून मृत्यू
लोहारा ता पाचोरा—प्रतिनिधी-–येथील मतिमंद युवकाचा नाचनखेडा रस्त्यावरील गट क्र.२३५ जवळील लोंदळी नाल्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज २५ रोजी सकाळी ७.३०वाजेच्या पूर्वी उघडकीस आली.याबाबत पोलीस पाटील सुरेंद्र शेळके यांनी पोलिसांना खबर दिली.
दरम्यान २२रोजी मतिमंद विकास उखा इंगळे (कोळी)हा त्याचे वहिनी कलाबाई भिका इंगळे हिच्या घरी चहा पिऊन घरून निघून गेला होता. त्यादिवशी विकास संध्याकाळी घरी आला नाही म्हणून गावात तपास केला असता मिळून आला नाही. मात्र तो नेहमी दोन-तीन दिवस घरी येत नव्हता. त्यामुळे आज-उद्या येईल अशा माहितीने त्यांनी पोलिसात मिसिंग केस नोंदली नाही.दरम्यान २५रोजी लोंदळी नाल्यातील पाण्यात बुडून मतिमंद विकास उखा इंगळे(कोळी) वय ४५ याचा मृत्यू झाला असल्याची घटना उघडकीस आली. दरम्यान लोहारा येथे २२रोजी मुसळधार पाऊस झाला होता. त्यामुळे लोंदळी नाल्यालाही खूप पाणी होते.त्या प्रवाहात विकास वाहून गेल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.याबाबत घटनास्थळी पंचनामा करण्यात येवून प्रेत वारसांना ताब्यात देऊन अंत्यविधी करण्यात आला. याबाबत पिंपळगाव हरे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर पुढील तपास लोहारा पोलिस दूरक्षेत्राचे हेड कॉन्स्टेबल निवृत्ती मोरे,पोलिस नाईक राकेश खोंडे हे करीत आहेत. विकास कोळी यांच्या मृत्यूबाबत लोहारा गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.