लोहारा ता पाचोरा–प्रतिनिधी—येथील रहिवासी व हल्ली जम्मू काश्मीर येथे बीआरओ मध्ये देशसेवा बजावत असलेले फौजी प्रसाद रामराम पवार यांच्या आईचे कोरोनामुळे १८ एप्रिल रोजी निधन झाले. त्यामुळे ते व्यथित झाले होते.मात्र त्यांनी दुःख असतांनाही बॉर्डरवर जशी देशसेवा करतात तशी गावांतही काही तरी कोरोना रुग्णांसाठी काही तरी सेवा करावी,अशी संकल्पना व सूचना त्यांचे मित्र ज्ञानेश्वर दिनकर कुमावत यांनी सुचविली.व त्यांनी होकार देत गरीब व सर्वसामान्य पॉझिटिव्ह कुटुंबातील व्यक्तींना आरसीएम कंपनीचे गीलोय तुलसी व गामा ओरिजिनल हे रोगप्रतिकारक शक्ती (ह्युमिनिटी )वाढीचे आयुर्वेदिक औषधे नुकतीच वाटप केले.
फौजी प्रसाद पवार यांच्या आई गयाबाई रामराव पवार यांचे कोरोनाने निधन झाल्याने गावातील गरीब व गरजू कुटुंबातील पॉझिटिव्ह असणाऱ्या कुणालाही रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी आयुर्वेदिक औषधे मिळावी,यासाठी फौजी प्रसाद पवार यांनी तब्बल प्रथम दहा हजार रुपयांची आयुर्वेदिक औषधे वाटप केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या या समाजाचे काही देणं लागतो,या दातृत्वाचा इतर राजकीय, सामाजिक व नोकरदार व्यक्तींनी आदर्श घ्यावा,व गाव कोरोनामुक्त करण्यासाठी आपापल्या परीने योगदान देऊन प्रसाद पवार यांच्याप्रमाणे समाजाला आधार दयावा,ही अपेक्षा..!!!