एक झाड २३ लाख रूपयेचा ऑक्सिजन एका वर्षाला देते– बाळासाहेब कोळपे
जळगांव प्रतिनिधी(दिपक पवार)–-ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य आधारस्तंभ श्री.बाळासाहेब कोळपे यांनी सांगितले की ,माणसे झाडे तोडायला पुढे मागे पाहत नाहीत. मात्र एक झाड त्यांना किती काय देत असते .
तर दरवर्षी तब्बल २३ लाख रूपयांचा ऑक्सिजन देते. एक मोठे झाड दररोज २३० लिटर ऑक्सिजन देत असते सिमेंट काँक्रीटच्या वाढत्या वापरामुळे जंगले नाहीशी होत आहेत. त्याचा परिणाम पर्यावरणावर दिसून येत आहे पिंपळ, कडुनिंब, वड आणि तुळशीची झाडे इतरांच्या तुलनेत जास्त ऑक्सिजन देतात.
आपल्याला जगायचे असेल तर झाडे लावलीच पाहिजे. सध्याचे ऑक्सिजनचे घटते प्रमाण पाहता झाडांचे महत्त्व लोकांनी वेळेतच ओळखले पाहिजे आणि झाडे लावली पाहिजेत. झाडे दरवर्षी कोट्यावधी रूपयांचे ऑक्सिजन फ्री मध्ये देत असते. ऑक्सिजनचे अर्थशास्त्र जाणून घेतले तर लक्षात येईल एक झाड आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचे आहे. सिमेंट काँक्रीटच्या वाढत्या वापरामुळे जंगले नाहीशी होत आहेत. त्याचा परिणाम पर्यावरणावर दिसून येतो. अवेळी येणारा पाऊस, वातावरणातील वाढती उष्णता, हवामानातील प्रचंड बदल हे सगळ आपण अनुभवतच आहोत. हे परिणाम जर भविष्यात कमी करायचे असतील तर आपल्याला झाडेही लावलीच पाहीजे.
ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य आधारस्तंभ मा.श्री.बाळासाहेब कोळपे यांनी सांगितले की, माणसे झाडे तोडायला पुढे मागे पाहत नाहीत. मात्र एक झाड त्यांना किती काय देत असते याचा अंदाज त्यांना नसतो. एक मोठे झाड दररोज २३० लिटर ऑक्सिजन देत असतो. या दरम्यान वातावरणातील ४८ पौंड कार्बन डायऑक्साईड आत घेत असतो. झाडाच्या जवळ कचरा जाळल्यास त्याची ऑक्सिजन देण्याची क्षमता अर्धी होते.
प्रत्येक माणसाला ५५० लिटर ऑक्सिजनची गरज
प्रत्येक व्यक्तीला जीवंत राहण्यासाठी दररोज ५५० लिटर ऑक्सिजनची आवश्यकता असते. श्वासाच्या माध्यमातून तुम्ही हा ऑक्सिजन घेत असता. आपण श्वासाच्या माध्यमातून जी हवा फुफ्फुसामध्ये घेतो त्यात २० टक्के ऑक्सिजन असतो. याचा अर्थ एखाद्या व्यक्तीला जिवंत राहण्यासाठी कमीत कमी तीन मोठ्या झाडांची आवश्यकता असते.
कडुनिंब, वड, पिंपळ, करज,नांद्रुक तुळस अशी झाडे लावा
पिंपळ, कडुनिंब, वड आणि तुळस जंगली झाडे जास्त ऑक्सिजन देतात. कडुनिंब, वड, तुळशीचे झाड एका दिवसांत २० तासांहून अधिक वेळ ऑक्सिजन निर्माण करतात. ऑक्सिजन बनवण्याचे काम झाडांची पाने करतात. झाडाचे एक पान एका तासात ५ मिलीलिटर ऑक्सिजन बनवण्याचे काम करते. यासाठी ज्या झाडांना जास्त पाने असतात ती झाडे अधिक ऑक्सिजन देण्याचे काम करतात.
८५०० रूपयांमध्ये ७५० लिटर ऑक्सिजन
विकासाच्या मार्गाकडे धावत असताना प्रदूषणाचा स्तर वेगाने वाढत आहे. यातच ऑक्सिजनचाही बाजार भरू लागला आहे. फ्रीमध्ये मिळणारा हा ऑक्सिजन आता मोठ्या दराने बाजारात विकला जाऊ लागला आहे. ऑनलाईन कंपन्या ८५०० रूपयांना ७५० लिटर ऑक्सिजन विकत आहेत. ही किंमत पाहता तुम्हीही नक्कीच विचार कराल की झाडे लावणे सोपे की विकतचा ऑक्सिजन घेणे असे प्रतिपादन बाळासाहेब कोळपे यांनी केले.
कोरोणा रूग्ण ऑक्सिजन न मिळाल्या मुळे कित्येक जीव जात आहेत. आपण सगळ्यांनी झाडे लावण्याचा निश्चय करूया. दुसऱ्यांसाठीही आणि स्वत:साठीही वर्षातून कमीत कमी पाच मोठे झाड लावूया,असे आवाहन ग्री्न फाऊंडेशनचे आधारस्तंभ बाळासाहेब कोळपे यांनी केले आहे.