कुऱ्हाड खुर्द ता.पाचोरा –प्रतिनिधी— येथील दैनिक लोकमत चे पत्रकार श्री. सुनील लोहार यांनी २० जुलै ला त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना च्या आजाराने मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना आर्थिक मदत केली. वर्षभर गावात ग्रामस्थांच्या मदतीने ते विविध सामाजिक कार्यक्रम राबवित असतात.त्यात महापूर निधी,भूकंप ग्रस्त, आग ग्रस्त,निधी ,रक्तदान शिबिर,कोरना योध्यांचा सत्कार किवा,एखाद्या अपघात ग्रस्त व्यक्तीस तना,धनाने मदत करणे अशे विविध उपक्रम राबवित असतात,या वर्षी त्यांनी मागील वर्षी कोरना च्या लाटेत जगातील नव्हे तर देशभरात अनेक लोक स्वार होत आपल्यातून निघून गेलेत, यात कुऱ्हाड खुर्द व बुद्रुक गावात तर कोरोनाच्या मृत्यूचे प्रमाण खूपच होते, यात कोणाचे तरुण वडील, तर कोणाची आई, तर काही दोघ पती पत्नी एकाच वेळी मृत्यू पावले.तर काही नवमाता कोरोनाच्या प्रकोपने आपल्या एक दिवसाच्या बाळांना सोडून गेल्या. यामुळे यांचा मागील परिवार पोरका झाला,यात गरिबीची परिस्थिती असलेले अनेक लोक देखील होते. यातील त्यांनी दहा लाभार्थी निवडून त्यांना प्रत्येकी अकराशे रुपयाची मदत देण्यात आली. ही मदत देण्याच्या वेळी काही वारसांना शासनातर्फे मिळणारी मदत कागद पत्राच्या पूर्तते अभावी मिळाली नाही, अशी खंत देखील गावातील काही महिलांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. हीच सामाजिक बांधिलकी जोपासत या कुऱ्हाड येथील पत्रकाराने आपल्या वाढदिवसानिमित्त या नातेवाईकांना मदत केली यामुळे अनेकांनी त्यांचे आभार मानले.
Support authors and subscribe to content
This is premium stuff. Subscribe to read the entire article.