*जळगांव प्रतिनिधी–(दिपक पवार)—-जळगांव जिल्हा तेली समाज मंडळ आयोजित राज्यस्तरीय वधु वर परिचय मेळावा दि२० नोव्हेंबर २०२२ रविवार. रोजी घेण्यात येणार असून यावर्षी मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात आलेले असल्याचे मंडळाच्या वतीने कळविण्यात आलेले आहे.
*वधू – वर नोंदणीसाठी रुपये ४००/- नाममात्र शुल्क ठेवण्यात आलेले असून वधु – वर परिचय मेळाव्यासाठी आतापर्यंत महाराष्ट्र राज्यभरातून तसेच शेजारचे मध्य प्रदेश व गुजरात राज्यातून अनेक वधू-वरांची नोंदणी झालेली असून मंडळाच्या ह्या उपक्रमास भरघोस प्रतिसाद मिळत आहे. फॉर्म भरण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोंबर,२०२२ असून अजूनही महाराष्ट्रभरातून ज्या समाजसेवक बंधू-भगिनींना आपल्या मुला मुलींचा फार्म भरावयाचा असेल त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून सहकार्य करावे,असे आवाहन जळगांव जिल्हा तेली समाज शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने करण्यात आलेले आहे.
वधू-वरांच्या नोंदणीसाठी परिचय भरून देण्याचे फॉर्म सर्व ठिकाणी मोफत देण्यात येत असून धुळे,चाळीसगाव,पाचोरा, जामनेर, शिरपूर,जळगाव, नंदुरबार अशा अनेक शहरांमध्ये प्रत्येक घरी परिचय फॉर्म पोहोचवण्याचे नियोजन मंडळाने केलेले असून बऱ्याच शहरांमध्ये ठराविक ठिकाणी फॉर्म उपलब्ध असून ज्यांनी आवश्यकतेनुसार मागितल्यास फॉर्म पोहोचवण्यात येत आहेत. मंडळाचे कार्यकर्ते त्यासाठी सक्रिय काम करीत असून मंडळाला अनेक मान्यवर तसेच मंडळाचे पदाधिकारी सहकार्य करीत आहेत .तर अनेक पदाधिकारी बंधू-भगिनी हे आपापल्या तालुक्यातील गावोगावी जाऊन फॉर्म वितरित करीत आहेत. मंडळाला सहकार्य करणारे सर्वच समाजसेवक बंधू भगिनींचे आभार मानून मंडळाच्या या उपक्रमात सर्वांनी हातभार लावावा, सहकार्य करावे व समाजाचा हा मेळावा यशस्वी करावा असे मंडळाच्या वतीने आवाहन करण्यात आलेले आहे.
*मेळाव्यामध्ये दरवर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा आकर्षक व सुबक अशी वधु – वर परिचय पुस्तिका ” २०२२ ” ही प्रकाशित करण्यात येईल तिचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होईल. या सुबक आणि आकर्षक दिसणाऱ्या पुस्तिकेसाठी उद्योजक व व्यावसायिक बांधवांनी आपल्या व्यवसाय व व्यापार वृद्धीसाठी जाहिरात द्यायची असेल किंवा ज्या समाजसेवक बंधू-भगिनींना आपली प्रसिद्धीसाठी जाहिरात करायची असेल त्यांनी या पुस्तिकेसाठी जाहिरात देऊन सहकार्य करावे. मेळाव्यासाठी वधू-वर नोंदणी व पुस्तिकेत जाहिरात देण्यासाठी समाजसेवक बंधू – भगिनी यांनी९४२३४८८५३० व ७९७२९०३७७५ या नंबर वर संपर्क साधावा असे देखील मंडळाने कळवले आहे.
*समाजरत्न स्व.आर टी आण्णा चौधरी नगर ,मॉडर्न गर्ल्स हायस्कूल, स्टेट बँक मुख्य शाखेजवळ ,जळगांव या ठिकाणी रविवार, दिनांक २० नोव्हेंबर, २०२२ रोजी सकाळी १० वाजता मेळाव्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते होईल. अनेक मान्यवर या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार असून मेळाव्यामध्ये उपस्थित राहणारे सर्व वधू-वर त्यांचे पालक, समाजसेवक बंधू – भगिनी यांच्यासाठी सुरेश सीताराम चौधरी(माजी नगराध्यक्ष धरणगाव)यांचेकडून मोफ़त भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तर कै. सांडू मोतीराम चौधरी यांचे स्मरणार्थ विनोद सांडू चौधरी व जगदीश सुरेश चौधरी(कृष्णा पावभाजी, जळगाव)यांचे कडून विनामूल्य चहा कॉफी ची व्यवस्था करण्यात आली आहे. तर मनोज बापू चौधरी यांचेकडून माफक दरात पाणी बॉटल ची व्यवस्था करण्यात आली आहे.
तसेच मेळावा प्रवेश यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारण्यात आलेले नाही, असे देखील जळगांव जिल्हा तेली समाज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष महेश रतन चौधरी व सचिव नारायण दयाराम चौधरी व सर्व संचालक मंडळ यांनी कळवले आहे.