लोहारा ता पाचोरा— प्रतिनिधी (दीपक पवार)–– लोहारा येथील प्रगतीशील शेतकरी चिंधू विठ्ठल चौधरी यांच्या शेतात तुलसी सीड्स प्रायव्हेट लिमिटेड गुंटूर कबड्डी बीजी टू या वाणाची पीक पाहणी कार्यक्रम व चर्चासत्र नुकतेच संपन्न झाले.
यावेळी तुलसी सीड्स चे एरिया मॅनेजर अनंत वराडे साहेब, अरुण शिरसाठ ,सचिन शेळके, विश्वास साबळे, सदानंद ताठे ,माजी सरपंच डॉ. बाळू जैन ,अमृत चौधरी, किसन पाटील ,ज्योती कृषी केंद्राचे संचालक राहुल कटारिया, शांताराम चौधरी, उदय कृषी केंद्राचे बापू देशमुख, सत्यम कृषी केंद्राचे विजय जैन, राजेंद्र जैन तसेच ,दीपक खरे,सुनिल खरे, दत्तू राठोड, ईश्वर देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी एरिया मॅनेजर अनंत वराडे यांनी पीक व्यवस्थापन खत व्यवस्थापन बोंड अळी याबद्दल शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले तसेच शेतकरी चिंधू विठ्ठल चौधरी यांच्या शेतात तुलसी सीड्स कबड्डी या वाणाला १४७ बोंडे व ४७ पाती लागल्याने यांच्या शेतांत पीक पाहणी करण्यात आली. लोहारा परिसरात प्रथमच कपाशीच्या झाडाला १४७ बोंडे आल्याने शेतकऱ्यांनी पाहण्यासाठी गर्दी केली होती.
हे कबड्डी कपाशीचे वाण पाहून शेतकरी समाधानी झाले व येणाऱ्या काळात कबड्डी वाण लावण्याचा संकल्प शेतकरी बांधवांनी केला आहे.१४७ बोंडे वजनदार असल्याने एकरी १६क्विंटल कापूस येण्याची शक्यता प्रगतीशील शेतकरी चिंधू विठ्ठल चौधरी यांनी व्यक्त केली आहे.यावेळी उपस्थित शेतकरी बांधव कृषी केंद्र संचालक यांनी भोजनाचा आस्वाद घेतला .यावेळी आभार चिंधू विठ्ठल चौधरी यांनी मानले.