लोहारा ता.पाचोरा (दिपक पवार)—
येथील दिव्यांग बांधवांना राज्याचे ग्रामविकास,वैद्यकीय शिक्षण, क्रीडा युवक कल्याण मंत्री ना. गिरीष महाजन यांच्या प्रेरणेतून व लोहारा भाजपा युवा नेते विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कैलास चौधरी तसेच लोहारा भाजपा शाखा यांच्यामार्फत दिवाळी भेट म्हणून प्रत्येकी एक हजार रुपयांचे वाटप करण्यात आले.
बऱ्याच दिवसापासून लोहारा येथील दिव्यांग बांधव पाच टक्के निधी पासून वंचित आहेत.
ग्रामपंचायतीने आलेल्या उत्पन्नातून ५% निधी दिव्यांगांच्या गरजा लक्षात घेऊन खर्च करायचा असतो. परंतु लोहारा ग्रामपंचायतीने तसे न करता स्वतःच्या मर्जी नुसार पंखे देण्याचे ठरवले. शासनाच्या आदेशाची पायमल्ली केली. मिळत असलेली वस्तु आपल्या उपयोगाची नसल्याने दिव्यांगानी ते घेण्यासाठी नकार दिला.
कारण काहींकडे अगोदरच पंखे होते तर काही कडे विज कनेक्शनच नव्हते. म्हणून त्यांनी ते नाकारले.
ही परिस्थिती लक्षात घेता व दिव्यांगांचा गरजा भागविण्यासाठी येथील भाजपा युवा नेते व माजी उपसरपंच,विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कैलास चौधरी यांनी ना. गिरीष महाजन यांच्या प्रेरणेने दिव्यांगांची दिवाळी गोड करण्याचे ठरवले.
कैलास चौधरी यांनी दि.२६ रोजी माळी समाज मंगल कार्यालयात सर्व वंचित दिव्यांगांना बोलवून स्वखर्चाने प्रत्येकी १ हजार रुपये रोख स्वरूपात दिले. एकूण ७८ दिव्यांगानी या रकमेचा लाभ या ठिकाणी घेतला.
या वेळी भाजपा जेष्ठ कार्यकर्ते ,विकासो चेअरमन शरद सोनार, माळी समाज अध्यक्ष कृष्णा भिवसने, सुनील देशमुख, भास्कर भोई, अतुल कोळी,प्रवीण चौधरी, नंदू सुर्वे,वसीम खान, रुपेश धनगर, अनिल तडवी,नंदू सुर्वे, पत्रकार रमेश शेळके, चंद्रकांत पाटील.
एकता दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश पाटील, सचिव विजय जाधव, खजिनदार कांतीलाल राजपूत, विकास भोई, अनिल चौधरी अहमदखान भिकनखान, बाळू जाधव, विठ्ठल धनगर, अनिल राजपुत यांच्या सह शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.