कुऱ्हाड ता पाचोरा –प्रतिनिधी(सुनिल लोहार)
कुऱ्हाड खुर्द येथील आदर्श माध्यमिक शाळेचा ईयात्ता दहावीचा विद्यार्थी हर्षवर्धन रवींद्र पाटील याची सप्टेंबर मध्ये नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय इन्स्पायर अवॉर्ड करिता निवड झाली होती. म्हणून त्याचा शाळेच्या वतीने सत्कार नानासाहेब व्ही. टी.जोशी उपचेअरमन पाचोरा तालुका शिक्षण संस्था यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी शालेय समिती आदर्श माध्यमिक विद्यालय कुऱ्हाड चे स्थानिक चेअरमन सतिश नारायण चौधरी, दगाजीराव विठ्ठल वाघ, ज्येष्ठ संचालक पी. टी.सी, सुनील पाटील, संचालक माजी शिक्षक शांताराम चौधरी,प्रा. सी.एन.चौधरी सर, रवींद्र पाटील,सौ. विजया पाटील या सर्वांची उपस्थिती लक्षणीय होती. हर्षवर्धन पाटील ने निवड झालेले मॉडेल प्रात्यक्षिक सादर केले. त्याच्या या उत्तुंग भरारी मागे शाळेचे विज्ञान शिक्षक सुहास मोरे यांचे मोलाचे योगदान लाभले. त्यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला.या सर्व घडामोडीत संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब दिलीप वाघ व चेअरमन नानासाहेब संजय वाघ यांचे सहकार्य लाभले. तसेच शाळेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव प्रसंगी विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्यातील प्रथम विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन राजू माळी यांनी केले तर आभार श्रद्धा पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वर्गाचे मोलाचे सहकार्य लाभले.