लोहारा ता पाचोरा—प्रतिनिधी–– गेल्या १७-१८ वर्षांपासून सत्तेत असलेल्या सरपंच अक्षय जैस्वाल यांनी वार्ड क्रमांक ४ मधील मागासवर्गीय वस्तीचा निधी वस्तीत वापर न करता इतरत्र खर्च दाखवून जाणीवपूर्वक शासनाच्या १५टक्के मागासवर्गीय ग्राम निधी व दलित वस्तीच्या निधींपासून मागासवर्गीयांना वंचित ठेवले आहे ,अशा तक्रारीचे निवेदन ग्रामपंचायत सदस्य दिपक खरे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील खरे व विजय बाविस्कर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प.जळगांव यांना दिले आहे व पदाचा गैरवापर करणाऱ्या सरपंच जैस्वाल यांचेवर कारवाई करावी व विकासकामांबाबत न्याय न मिळाल्यास १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणाला बसणार असल्याचे म्हटले आहे फेब्रुवारी२०२३ मध्ये वार्डातील पुरुष-महिला यांनी मागासवर्गीय वस्तीत १५टक्के मागासवर्गीय ग्राम निधी व १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून विकासकामे करावीत ,या मागणीचा लेखी अर्ज दिला मात्र या अर्जालाही सरपंच जैस्वाल यांनी केराची टोपली दाखवत १५वर्षांपासून विकासापासून वंचित ठेवले आहे,असे निवेदनात म्हटले आहे.तसेच यापूर्वी अनेकदा तोंडी व लेखी अर्ज देऊन ही मागासवर्गीय वस्तीत ग्रामपंचायत प्रशासनाने विकासकामे केली नसल्याने ३१ जुलै रोजी विकास कामांबाबत सरपंच यांना स्मरण देण्यासाठी वार्डातील नागरिक भेटले असता सरपंच यांनी बेजबाबदारपणे वक्तव्य केले की,तुमचे विकास कामे करण्यास मी बांधील नसून तुमच्या कडून जे होईल ते करा, माझी तक्रार वरिष्ठ अधिकारी यांचेकडे करा,मला काही फरक पडत नाही.अशा प्रकारे मागासवर्गीय नागरिकांना वागणूक मिळत आहे आणि एकीकडे शासन मागासवर्गीय वस्ती सुशोभीकरण व मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी कटिबद्ध आहे अन लोहारा गावात सुविधा व विकासकामांपासून वंचित ठेवले जात आहे.
त्यामुळे वरिष्ठ अधिकारी यांनी प्रत्यक्ष मागासवर्गीय वस्तीत येऊन सत्य परिस्थिती बघावी व आम्हाला न्याय दयावा.व सरपंच यांचेवर तात्काळ कारवाई करावी.न्याय न मिळाल्यास येत्या १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाला बसणार असल्याचे ग्रामपंचायत सदस्य दीपक खरे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील खरे, विजय बाविस्कर यांनी वरिष्ठांना निवेदनाद्वारे कळविले आहे.