लोहारा ता पाचोरा– (दिपक पवार)--ग्रामीण भागातील बातम्या वेब न्यूज पोर्टल च्या माध्यमातून कमी वेळेत जास्तीत जास्त प्रसारित होत असल्याने हल्ली वेब न्यूज पोर्टलचे खूपच महत्त्व वाढल्याचे सर्वत्र दिसून येते.याच धर्तीवर लोहारा परिसरात पत्रकार दिपक वामनराव पवार यांनी ‘खान्देश न्यूज’ हे वेब न्यूज पोर्टल दोन वर्षांपूर्वी सुरू केले.त्या न्यूज पोर्टल चे काम अधिक जोमाने करण्यासाठी त्यांना लोहारा ता पाचोरा येथील ज्येष्ठ पत्रकार महेंद्र भिमराव शेळके यांची मोलाची साथ मिळाली असून त्यांनी आज “९ ऑगस्ट क्रांती दिनाचे” औचित्य साधून “खान्देश न्यूज’ च्या संपादक पदाची जबाबदारी स्विकारली आहे.
महेंद्र शेळके यांनी यापूर्वी दै.लोकमत या वृत्तपत्रात ३२ वर्षे निष्कलंकपणे पत्रकारिता करीत अनेक समस्या ,प्रश्न व अन्यायाला वाचा फोडण्याचे काम केले आहे.त्यांच्या या पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभवाचा “खान्देश न्यूज”ला नक्कीच फायदा होणार आहे.
महेंद्र शेळके यांनी खान्देश न्यूज च्या संपादक पदाची जबाबदारी स्विकारल्याबद्दल त्यांचा ज्येष्ठ पत्रकार कृष्णराव शेळके,रमेश शेळके,दिपक पवार ,चंद्रकांत पाटील,दिलीप चौधरी, ज्ञानेश्वर राजपूत, गजानन क्षिरसागर, ग्रामपंचायत सदस्य दिपक खरे यांनी शाल ,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
महेंद्र शेळके यांचे खान्देश न्यूज परिवारात मनःपूर्वक स्वागत..!!💐💐💐