लोहारा ता पाचोरा–प्रतिनिधी–येथील भाऊसो.तुकाराम आनंदा माळी पतसंस्थेच्या सर्व सभासदांना भेटवस्तू म्हणून आकर्षक चादर व लाभांशचे वाटप नुकतेच करण्यात आले.
यावेळी भाजपचे लोहारा-कुऱ्हाड जिल्हा परिषद गटाचे गटनेते संजय शांताराम पाटील यांच्या शुभहस्ते संस्थेच्या सर्व सभासदांना भेटवस्तू म्हणून आकर्षक चादर चे वाटप करण्यात आले.
यावेळी भाऊसो. तुकाराम आनंदा माळी पतसंस्थेचे चेअरमन डॉ.सुभाष घोंगडे यांनी संजय शांताराम पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.तर सेवानिवृत्त शिक्षक तुकाराम गायकवाड यांचा सत्कार मुरलीधर गिते यांनी केला. यावेळी चेअरमन डॉ. सुभाष घोंगडे यांनी प्रास्ताविक केले. संस्था स्थापनेपासून सभासदांना दरवर्षी लाभांश देत असून व मागील वर्षी लाभांशसोबत चांदीचे नाणे व यंदा लाभांश व आकर्षक चादर प्रत्येक सभासदांना मिळणार आहे. तसेच सभासदांना लाभांश व भेटवस्तू देणारी लोहारा पंचक्रोशीतील एकमेव पतसंस्था असल्याचे चेअरमन डॉ.सुभाष घोंगडे यांनी सांगितले.
यावेळी ज्येष्ठ भाजप कार्यकर्ते शरद सोनार,विकासो चेअरमन सुनिल क्षिरसागर,संचालक प्रभाकर चौधरी, शिवराम भडके, विवेक जाधव,विजय पालीवाल, ज्ञानेश्वर माळी, ज्ञानेश्वर चौधरी, देवानंद भोई,वंदना बनकर,सुनंदा गिते, हिरालाल जाधव,विठ्ठल बनकर,सुभाष माळी,मुरलीधर गिते, नितीन परदेशी, महेंद्र शेळके व सभासद उपस्थित होते.चेअरमन डॉ.सुभाष घोंगडे यांच्या नियोजनपूर्वक कारभारामुळे सर्व सभासदांना दरवर्षी लाभांश व दोन वर्षांपासून भेटवस्तू मिळत असल्याने सभासदांनी समाधान व्यक्त करीत संस्थेच्या संचालक मंडळ व कर्मचारी यांचे विशेष आभार व्यक्त केले आहे. यावेळी सूत्रसंचालन पत्रकार दिपक पवार यांनी केले तर आभार संस्थेचे सचिव रमेश सरोदे यांनी मानले.