लोहारा ता पाचोरा—(महेंद्र शेळके)– येथील जिल्हा परिषद मराठी मुलांची केंद्र शाळेचे उपक्रमशील शिक्षक अंकुश नागु भुत्ते यांना धुळे येथील नैसर्गिक मानवधिकार सुरक्षा परिषद फोरम तर्फे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
लोहारा येथील जिल्हा परिषद मराठी मुलांच्या केंद्र शाळेत नाविन्यपूर्ण उपक्रम ,कोरोना काळात केलेली शैक्षणिक सेवा व विविध उपक्रमात कायम विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन करणारे अंकुश नागु भुत्ते यांच्या या कार्याची दखल घेत धुळे येथील नैसर्गिक मानवधिकार सुरक्षा परिषद फोरम ने त्यांची आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करून त्यांचा सन्मान केला आहे.
दिनांक १ऑक्टोबर रोजी धुळे येथील अजय लॉन्स, धुळे नगाव येथे पुरस्काराचे वितरण नैसर्गिक मानवधिकार सुरक्षा फोरम चे राष्ट्रीय अध्यक्ष गोरख देवरे व व उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रफुल सिताराम पाटील यांच्या शुभहस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
उपशिक्षक अंकुश भुत्ते यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे पाचोरा गटशिक्षणाधिकारी गिरीष जगताप,लोहारा केंद्राचे केंद्रप्रमुख जितेंद्र पाटील , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील खरे ,पत्रकार दीपक पवार, मुख्याध्यापिका स्मिता कुमावत तसेच लोहारा केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.