खान्देश न्यूज –विशेष प्रतिनिधी—पाचोरा तालुक्यातील जि.प.प्राथमिक शाळा, मोंढाळे येथे दि.३० सप्टेंबर शनिवार रोजी माजी अध्यक्ष वाल्मिक पाटील यांचे अध्यक्षते खाली पालक मिटिंग घेण्यात आली. त्यात सर्वानुमते शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी एकनाथ सोनवणे, उपाध्यक्षपदी मल्हारी पाटील तर सदस्य म्हणून दिनेश वाघ, प्रमोद पाटील, महेंद्र माळदे, मोईद्दीन, सौ.मीना तडवी, अरुण पाटील सर, सौ. योगिता धनराज पाटील यांची निवड करण्यात आली.यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचा सत्कार मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांनी केला. सदरील निवड झाल्या नंतर श्री.धनराज पाटील सरांना नुकतीच पीएचडी(P.hd) पदवी मिळाल्या बद्दल नवनियुक्त समिती कडून त्यांचा सत्कार करण्यात आला. सदरील निवडी साठी विदयार्थ्यांचे सर्व पालक, ग्रामस्थ, मागील शाळा व्यवस्थान समितीचे पदाधिकारी व शिक्षकवृंद उपस्थित होते.