- खान्देश न्यूज–(विशेष प्रतिनिधी)–आशा स्वयंसेविका,गटप्रवर्तक यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे या मागणीसाठी ( दि.१८) पासून राज्यव्यापी बेमुदत संपावर जाणार आहेत.संपाची जाहीर नोटीस देण्यासाठी जिल्हातील आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांचा संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण पाटील यांच्या नेतृत्वाखालील मंगळवारी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला.या वेळी आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांच्या घोषणांनी जि.प.परीसर दणाणला होता.
आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांच्या मोर्चा ला डॉ.शामा मुखर्जी उद्यानापासुन सुरुवात झाली.जि.प.समोरील रस्त्यावर आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांनी ठिय्या मांडून आंदोलन केले . यावेळी जिल्हा प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.यावेळी शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत यांना निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली.सदर चर्चेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सचिन भायेकर, जिल्हा समूह संघटक प्रविण जगताप, भगिरथी पाटील, कल्पना भोई, सुनंदा पाटील,लता सुधीर,प्रिती चौधरी सहभागी होते.
यशस्वीतेसाठी सुनंदा हडपे, संगिता पाटील,भारती नेमाडे, आशा पोहेकर,उषा पाटील, उज्वला काळे,भारती तायडे,माया बोरसे,रविशा मोरे, नम्रता पाटील,हर्षी पाटील,भारती चौधरी, उषा मोरे यांनी सहकार्य केले.
आज दुपारी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित यांच्या सोबत बैठक
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकीत यांनी शिष्टमंडळाला सांगितले की जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांच्या मागण्यांबाबत शासन स्तरावर शिफारस केली जाईल.तसेच जिल्हा पातळीवरील अडचणी सोडविण्यासाठी बुधवारी दि.१८रोजी दुपारी ३वाजता संघटनेच्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.