लोहारा ता पाचोरा—(विशेष प्रतिनिधी)-–येथील जिल्हा परिषद मराठी मुलींची शाळेत दोन वर्षांसाठी शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन करण्यात आले.यात शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी दै.दिव्यमराठी चे पत्रकार तथा खान्देश न्यूज चे मुख्य संपादक दिपक वामनराव पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी १ ली ४ थीच्या पालकामधून ९ सदस्यांची निवड शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात करण्यात आली .यात अध्यक्ष म्हणून दिपक वामन पवार,उपाध्यक्ष म्हणून प्रल्हाद नामदेव चौधरी तर सदस्य म्हणून प्रकाश शंकर सोनवणे,गजानन सरोदे,विद्या अनिल मेहरे,मंगला भरत लोहार ,सोनी जगदीश तेली,लता पुंडलिक भिवसने ,जयश्री कृष्णा कोळी यांची निवड पालकांनी केली.तर शिक्षक प्रतिनिधी श्रीमती संध्या पाटील,सचिव तथा मुख्याध्यापक विजयसिंग राजपूत व शिक्षणतज्ञ म्हणून दत्तात्रय भोसांडे यांची निवड करण्यात आली.
यावेळी नवनिर्वाचित शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दीपक पवार यांचा सत्कार मुख्याध्यापक विजयसिंह राजपूत यांनी केला. तर उपाध्यक्ष प्रल्हाद चौधरी यांचा सत्कार कृष्णा तपोने यांनी केला.तर सर्व सदस्यांचा सत्कार शिक्षक वृंद यांनी केला.
यावेळी जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असून शाळेत विविध उपक्रम व सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे नवनिर्वाचित शाळा व्यवस्थापन समितीअध्यक्ष दिपक पवार यांनी सांगितले.
दिपक पवार यांच्या निवडीबद्दल त्यांचे पंचायत समिती माजी उपसभापती अनिता चौधरी ,भाजपचे युवा नेते माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कैलास चौधरी, उपसरपंच दिपक खरे,डॉ.केयुर चौधरी,चेअरमन डॉ.सुभाष घोंगडे, शरद सोनार,वृत्तपत्र पत्रकार मंच अध्यक्ष चंद्रकांत पाटील, खान्देश न्यूज चे संपादक महेंद्र शेळके,ज्येष्ठ पत्रकार कृष्णराव शेळके,रमेश शेळके,ज्ञानेश्वर राजपूत,दिलीप चौधरी, गजानन क्षीरसागर, विकासो चेअरमन सुनिल क्षिरसागर, रमेश लिंगायत, संभाजी चौधरी, जि प.मुलांची शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीअध्यक्ष सुनिल खरे ,प्रविण चौधरी, अतुल कोळी,भास्कर भोई,अमोल पाटील,नंदू सुर्वे,शेणफडू कोळी,राजू गिते ,अनिल तडवी,शरद कोळी,सादिक खान आदींनी अभिनंदन व कौतुक केले.