लोहारा ता पाचोरा–प्रतिनिधी–येथील भाऊसो तुकाराम आनंदा माळी पतसंस्थेचे सभासद भिका कुंभार यांच्या मुलीला किडनीच्या आजाराने त्रस्त केल्याने त्यांना चेअरमन डॉ.सुभाष घोंगडे यांनी पतसंस्थेमार्फत सभासद कल्याण निधीतून दहा हजार रुपयांचा धनादेश देऊन मदतीचा हात दिला आहे.चेअरमन डॉ.सुभाष घोंगडे यांच्या दातृत्वचे सर्वत्र कौतुक होत आहे.
संस्थेचे सभासद भिका कुंभार हे सर्वसामान्य कुटुंबातील असून त्यांची लहान मुलगी पूनम भिका कुंभार हिला किडनीच्या आजाराने त्रस्त केल्याने त्यांना आठवड्यातुन दोन वेळेस डायलिसिस करावे लागत आहे.यासाठी ते आर्थिक संकटातून जात आहेत. त्यामुळे आपला सभासद संकटात असल्याने त्याला आपल्या परीने थोडा हातभार लावावा, या हेतूने संस्थेचे चेअरमन डॉ.सुभाष घोंगडे व संचालक मंडळाने चर्चा केली व संस्थेच्या कार्यालयात भिका कुंभार ,पूनम कुंभार यांना चेअरमन डॉ.सुभाष घोंगडे यांच्या हस्ते दहा हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला.यावेळी संचालक विठ्ठल बनकर,हिरालाल जाधव,ज्ञानेश्वर माळी, मुरलीधर गिते,विजय पालीवाल,महेंद्र शेळके,दिपक पवार,चंद्रकांत पाटील, दिलीप चौधरी, ज्ञानेश्वर राजपूत ,मॅनेजर रमेश सरोदे उपस्थित होते.
भाऊसो तु.आ.माळी पतसंस्थेने यापूर्वी संस्थेच्या सामाजिक कल्याण निधीतून डॉ.पंडित विद्यालयात विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची टाकी,जिल्हा परिषद कन्या शाळेत पाण्याची टाकी, स्मशानभूमीत पाण्याची टाकी,दत्त मंदिर व राममंदिरात भाविकांना बसण्यासाठी बाकडे(बेंच),लोहारा व परिसरासाठी शवपेटी दिली असून संस्था नेहमीच गांव व सभासदांच्या मदतीसाठी तत्पर असल्याचे चेअरमन डॉ.सुभाष घोंगडे यांनी सांगितले.