लोहारा ता पाचोरा–प्रतिनिधी—येथील महर्षी वाल्मिक मित्र मंडळ व समाज बांधवांतर्फे कोळी समाजाचे दैवत महर्षी वाल्मिक ऋषी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी महर्षी वाल्मीक ऋषी यांच्या प्रतिमेचे पूजन लोहारा ग्रामपंचायत उपसरपंच दीपक खरे ,ग्रामपंचायत सदस्य कैलास चौधरी ,शरद कोळी,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिपक पवार,विकासो संचालक विकास देशमुख ,लक्ष्मण कोळी, जेष्ठ नागरिक शांताराम कोळी, विकास कोळी, योगेश कोळी ,अमोल कोळी ,संभाजी कोळी, रमेश कोळी यासह समाज बांधवांनी केले.
यावेळी बगगीवर महर्षी वाल्मिक ऋषी लवकुश यांच्या सजीव वेशभूषा केलेल्या व बँडच्या गजरात फुलांची उधळण करत संपूर्ण गावातून मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली यावेळी मिरवणुकीत सर्व समाज बांधव बंधू भगिनी व युवक मोठ्या उत्साहाने उपस्थित होते.