लोहारा ता पाचोरा–(दिपक पवार )–येथील वार्ड क्रमांक ६ मध्ये आ. गिरीषभाऊ महाजन यांच्या निधीतून व ग्रामपंचायतीने केलेल्या लाखो रुपयांच्या विकासकामांबाबत वार्डातील नागरिकांनी समाधान व्यक्त करीत सरपंच-उपसरपंच व सदस्यांचे आभार मानत पदाधिकाऱ्यांना वार्डात बोलावून सन्मानपूर्वक सत्कार करीत आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली.
वार्ड क्रमांक ६ मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याची कामे,गटारी व ढापेची समस्या भेडसावत होती. मात्र अनेकदा तक्रार करूनही समस्या जैसे थे आहेत, अशा तक्रारी स्थानिक नागरिकांनी केल्या . याबाबत ग्रामपंचायतीच्या सरपंच मालती पाटील, उपसरपंच कैलास चौधरी व सदस्यांनी तात्काळ दखल घेत प्रत्यक्ष वार्डात जाऊन नागरिकांना विश्वासात घेऊन समस्या जाणून घेतल्या.व भोई गल्लीसह वार्डात पेव्हरब्लॉक,ढापे,गटारी ची लाखो रुपयांची विकासकामे केल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला. व पदाधिकारी व सदस्यांना वार्डात बोलावून सन्मानपूर्वक सत्कार करीत आभार मानले. यावेळी कैलास चौधरी यांनी वार्ड क्रमांक ६ मध्ये झालेल्या विकासकामांबाबत माहिती दिली. व वार्डात राहिलेले कामे येत्या काळात नक्कीच पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन दिले. यावेळी संजय पाटील, राजू महाजन, शेख हसन साहेबलाल ,कृष्णा भिवसने,राजू गीते, नथ्थू सरोदे,सुनिल देशमुख, संभाजी चौधरी, प्रवीण चौधरी, चंद्रकांत पाटील,भास्कर भोई,राजाराम भोई,माधव पवार,भागवत माळी(कपाळे ), शाम बागुल ,राजू धोबी, भाऊराव अहिरे , दिपक माळी, विनोद अहिरे
संजय चौधरी,सह वार्डातील ज्येष्ठ, युवक ,महिला उपस्थित होत्या.