लोहारा येथील पत्रकार ज्ञानेश्वर राजपूत यांना शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगरतर्फे कोरोनायोध्दा गौरवपत्र
लोहारा ता.पाचोरा—प्रतिनिधी—येथील दैनिक पुण्यप्रतापचे पत्रकार ज्ञानेश्वर(नाना) राजपूत यांनी पत्रकारिता क्षेत्रात असल्यापासून आपल्या माध्यमातून तळागाळातील परिसरात घडत असलेल्या घडामोडी लिखाण करून प्रसारित केल्या आहेत.यामुळे त्यांना महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ जळगाव व सुलक्ष्मी बहुउद्देशीय संस्था औरंगाबाद यांनी उत्कृष्ट पत्रकार व समाजसेवक म्हणून गौरविले आहे. सोबतच कोरोना महामारीबाबतीत रोखण्याबाबत उपाययोजना याचा प्रचारही केला .मानवी जीवनात अपवादात्मक गोष्टी घडतात ग्रामस्थ नियमांची कशाप्रकारे धजी उडवून कोरोना(कोविड-१९) याला आमंत्रण कशा प्रकारे देत आहे, याबाबतही लिखाण केले. यामुळे असंवेदनशील लोकांना जागवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला गेला काम करताना प्रेरणा मिळावी.यासाठी शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर यांनी दखल घेत कोरोना योद्धा म्हणून गौरवपत्र देऊन भावी वाटचालीस सदिच्छा दिल्या. याबाबत लोहारा शहर पत्रकार मंचनेही त्यांचे अभिनंदन केले.