लोहारा येथे विधान परिषद आमदार चंदु भाई पटेल यांच्या स्थानिक विकास निधी योजने अंतर्गत हायमास्ट
लोहारा ता पाचोरा—-प्रतिनिधी–मा.आमदार श्री. गिरीषभाऊ महाजन (मा.जलसंपदा मंत्री) यांच्या प्रयत्नाने व मा.श्री.चंदूभाई पटेल विधान परिषद,आमदार यांच्या स्थानिक विकास योजनेअंतर्गत लोहारा येथे श्री बैठक हॉल जवळ हायमास्ट बसवण्यात आले. त्यामुळे सर्व ग्रामस्थ व श्री बैठक सदस्य समाधानाचे वातावरण आहे. बैठकीला जाण्या येण्यासाठी श्री सदस्यांना अंधारात वाट काढत जावे लागत होते. या सोलर हायमास्ट मुळे मोठी समस्या दूर झाली आहे. सर्व श्री सदस्य व ग्रामस्थ यांनी आ.गिरीषभाऊ महाजन व आ.चंदुभाई पटेल यांचे आभार मानले आहेत. तरी अजून गावांमध्ये पुढील काळात काही भागात हायमास्ट व कॉंक्रीटीकरण आमदारांनी दिलेे आहे. या हाय मास्ट साठी परिसरातील श्री सद्स्य , सरपंच उपसरपंच ,भाजपा सदस्यांनी आ. गिरीष भाऊ महाजन यांच्या कडे मागणी केली होती. व त्या मागणीला यश आले आहे.