लोहारा ता पाचोरा–लोहारा येथे गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोना बाधीतांची संख्या ४ वर असतांना गेल्या दोन दिवसांत ही संख्या १२ पोहचली आहे.दरम्यान परिसरातील पाळधी,पहूर ही गांवे हॉटस्पॉटआहेत.तर लोहारा येथेही गेल्या दोन दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने “लोहारेकरांनी आतातरी सावधान व्हावे”अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
लोहारा येथे आढळलेले सर्व १२ ऍक्टिव्ह रुग्ण हे गृहविलगिकरणात आहेत. त्यामुळे ते १४ दिवस कुणाच्याही संपर्कात येऊ नये, यासाठी आरोग्य विभागाने जनजागृती करावी व ग्रामपंचायत प्रशासनाने ठोस पावले उचलून उपाययोजना करावीत तसेच अशी अपेक्षा सुज्ञ नागरिकांनी केली आहे.
तसेच गृहविलगिकरणात असलेल्या रुग्णांना उपचार घेण्यासाठी आरोग्य विभागाची कुठल्याही प्रकारची स्वतंत्र व्यवस्था नसल्याने १४ दिवस क्वारंटाइन होऊन बाधित रुग्णालाच त्याची व कुटुंबातील सदस्यांची काळजी घ्यायची आहे.
येथील स्थानिक खाजगी वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांनी कोरोना संशयित रुग्णांची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यासाठी आरोग्य केंद्रात कळवावे ,असे ग्रामपंचायत प्रशासन व वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
लोहारा येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आतापर्यंत ६५० जणांनी लस घेतली असल्याची माहिती, वैद्यकीय अधिकारी डॉ.देवेंद्र पाटील यांनी सांगितले. तर ४५ वर्षांवरील सर्वांनी लसीकरण करून घ्यावे,असे आवाहन केले आहे.
—–लोहारा प्राथमिक आरोग्य केंद्रात मिनी कोव्हिड सेंटर सुरू करावे—–
येथे गेल्या२ दिवसांत कोरोना बाधितांची संख्या १२ वर पोहचली आहे.हे सर्व ऍक्टिव्ह रुग्ण हल्ली गृह विलगिकरणात आहेत.मात्र घरातील सदस्यांना वगळून जरी ते वेगळे राहत असले तरी काही अंशी का होईना त्यांचेशी संपर्क येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने लोहारा प्राथमिक आरोग्य केंद्राची प्रशस्त इमारतीत मिनी कोव्हिड सेंटर सुरु करावे,जेणेकरून गोरगरीब कोरोना ग्रस्त रुग्णांना आरोग्य सेवा चांगली मिळून लोहारा परिसरासाठी सोईचे होणार असल्याने लोहारा प्राथमिक आरोग्य केंद्रात मिनी कोव्हिड सेंटर सुरू करावे,अशी मागणी होत आहे.