लोहारा ता पाचोरा–प्रतिनिधी—
पाचोरा तालुक्यातील आंबे वडगांव तांडा येथील विजय दादा राठोड या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष विजय राठोड यांनी कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव पाहता लोहारा परीसरातील १५ गावामधे पाच प्रशिक्षित युवकांच्या माध्यमातून कोरोना व्हायरस बाबत जनजागृती करण्याचा उपक्रम हाती घेत लोहारा व परिसरातील गावात सतत वर्दळ असलेल्या चौकाचौकात दोन पंपद्वारे परीसर सॅनिटायझर करीत गावातील जवळपास २००० नागरिकांना सॅनिटायझर व मासचे वाटप करण्यात आल्याचे विजय राठोड यांनी सांगितले.
गेल्या दोन महिन्यांपूर्वी विजय राठोड यांनी त्यांच्या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून संत गाडगेबाबा बाबा यांच्या जयंतीनिमित्त ग्रामस्वच्छता अभियान राबविले होते,त्यानंतर शनिवारी व रविवारी सकाळी सकाळी आठ वाजल्यापासून बिल्दी,साजगांव,सांगवी प्र लो,नाईकनगर,कुऱ्हाड खु,कुर्हाड बुद्रुक,रामेश्वर, म्हसास, लोहारा,कासमपूरा, शहापूरा, कळमसरा, आंबेवडगाव,कोकडी,जोगे तांडा, आंबेवडगाव तांडा,आंबेवडगाव,लाखतांडा,वरखे डी,भोकरी,सार्वेजामने या गावात दोन दिवस कोरोना व्हायरस बाबत जनजागृती करुन गावातील वर्दळीच्या ठिकाणे सॉनिटायझरींग करणे,मास व सॅनिटायझर वाटप करुन कोरोना व्हायरसची साकळी तोडण्यासाठी सोशल डिंस्टंन्सचे पालन करणे,मास लावणे,नियमित हात धुणे या विषयावर पाच पाच युवकांचे दोन गृप तयार करून जनजागृतीची केली.
यावेळी विजयदादा राठोड, लक्ष्मण राठोड, संजु पाटील, विपुल राठोड, गुरुदास राठोड, विजय ज़ाधव, श्रीराम राठोड, नीलेश पाटील, सुभाष राठोड, हर्षल पाटील, समाधान वाघ, सूधाकर राठोड, विक्की राठोड, वासुदेव जाधव,संतोष पाटील आदींनी जनजागृती केली.
ही मोहीम यशस्वी करण्यासाठी गावातील सरपंच उपसरपंच,ग्राम पंचायत सदस्य,विकास सोसायटीचे पदाधिकारी, ग्रामसेवक, पोलिस पाटील,तंटामुक्तीचे अध्यक्ष,तलाठी, कोतवाल यांचे सहकार्य मिळाले असल्याचे विजय राठोड यांनी सांगितले.