लोहारा ता पाचोरा–प्रतिनिधी— येथे आज थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले जयंती साजरी करण्यात आली.वेळी महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त सुर्वे वाचनालयात माणुसकी समूहातर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले. माणुसकी समूह वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. यामध्ये आज महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. तरुण समाजसेवक गजानन क्षीरसागर यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याचा सविस्तर परिचय करून दिला. समाजसुधारक, शेतकऱ्यांचे कैवारी, स्त्रीशिक्षणाचे उद्गाते म्हणून ज्योतिराव फुले यांची ओळख आहे, असे त्यांनी सांगितले.कवी मंगलदास मोरे यांनी आपली कविता सादर केली. जवान चंद्रकांत गीते,व रमेश लिंगायत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या छोटेखानी कार्यक्रमाला माणुसकी समूह जळगाव जिल्हाध्यक्ष समाजसेवक गजानन क्षीरसागर, परीट धोबी समाजाचे जिल्हाध्यक्ष रमेश लिंगायत, , कवी मंगलदास मोरे, सीआरपीएफ जवान चंद्रकांत गीते, सुभाष गीते, योगेश वाणी,प्रतीक डांबरे हजर होते.