लोहारा ता पाचोरा—-येथे गेल्या काही दिवसांपासून कोरोना ने डोके वर काढले असून लोहारा गावांत कोरोना बाधित८६ रुग्ण असून ४७ कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण असून ५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे लोहारा गांव हे हॉटस्पॉट होत असल्याची स्थिती आहे.
त्या पार्श्वभूमीवर जामनेर विधानसभा क्षेत्राचे आमदार गिरीष महाजन यांनी माहिती घेत स्वीय सहाय्यक तथा आरोग्यदुत अरविंद देशमुख ,जिल्हा परिषद सदस्य अमित देशमुख हे आरोग्य टीम सह लोहारा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाले. यावेळी पाचोरा प्रांत राजेंद्र कचरे यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार कैलास चावडे ,तालुका वैद्यकीय अधिकारी समाधान वाघ यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात बैठक घेऊन कोरोना संसर्ग रोखण्यासाठी रॅपिड अँटीजेन टेस्ट वाढवाव्यात,संपूर्ण गावात सोडियम हायड्रोक्लोराईड ची फवारणी करावी व जनजागृती करण्याच्या सूचना ग्रामपंचायत व आरोग्य कर्मचारी यांना केल्या.तसेच लोहारा आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या १७ गावातील कोरोना ची स्थितीचा आढावा प्रांत कचरे यांनी घेतला.यावेळी लोहारा सरपंच अक्षय जैस्वाल, ग्रामपंचायत सदस्य कैलास चौधरी,भाजपा वैद्यकीय आघाडीचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख डॉ. केयुर चौधरी, वैद्यकीय अधिकारी डॉ.देवेंद्र पाटील व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
लोहारा येथे मिनी कोव्हीड सेंटर सुरू होणार ??
लोहारा येथे काही गरीब कुटुंबातील व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या आहेत मात्र त्यांचेकडे आर्थिक स्थिती सक्षम नाही व काहींकडे छोटे घर नि एकत्र कुटुंब व शौचालय नसल्याने गैरसोय होत आहे.तर ते सुपर स्प्रेडर ठरू शकतात, त्यामुळे लोहारा आरोग्य केंद्रात मिनी कोव्हीड सेंटर सुरू करावे,अशी मागणी यावेळी लोहारा शहर पत्रकार मंच तर्फे पत्रकार दीपक पवार यांनी प्रांत राजेंद्र कचरे यांचेकडे केली.त्याची तात्काळ दखल प्रांत कचरे यांनी घेत लोहारा आरोग्य केंद्रात किती बेड सुरू करता येतील?व रुग्णांची व्यवस्था कशी करता येईल?याची इमारतीला प्रत्यक्ष भेट देऊन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.समाधान वाघ ,डॉ.देवेंद्र पाटील यांच्याशी चर्चा केली. याकामी काही निधी उपलब्ध करून देण्यात येईल ,असे सांगितले. व मिनी कोव्हिड सुरू करण्याच्या सूचना दिल्या.
प्रतिक्रिया—लोहारा आरोग्य केंद्रात मिनी कोव्हिड सुरू होणार असेल तर आ.गिरीष महाजन यांच्या मार्फत आरोग्य सुविधा व ऑक्सिजन साठी पाईपलाईन वगैरे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितल्यावर ४८ तासात पूर्ण करून देण्यात येईल फक्त कोरोना रुग्णांना लागणाऱ्या ऑक्सिजन ची हमी शासनाने घ्यावी,लोहारा -कुऱ्हाड परिसरात वाढणाऱ्या कोरोना रुग्णांनी निःसंकोचपणे टेस्ट करावी,पॉझिटिव्ह असल्यास त्यांचा खाजगी कोव्हिड रुग्णालयात संपूर्ण खर्च आ.गिरीश महाजन हे करणार आहेत.आपली सर्वांची जबाबदारी आ.महाजन यांनी घेतली असून आपला गाव ,परिसर कोरोनामुक्त करण्यासाठी सहकार्य करावे व आम्हीही प्रशासनास मदत करण्यासाठी तत्पर आहोत.
अरविंद देशमुख,
आरोग्यदुत तथा स्वीय सहाय्यक
प्रतिक्रिया—लोहारा गावात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह कुटुंबातील सदस्य हे रॅपिड टेस्ट साठी आरोग्य केंद्रात जातात मात्र गेल्या काही दिवसात रॅपिड टेस्टची किट च उपलब्ध नाहीत. तर कधी फक्त तोकड्या ५० किट येतात.त्यामुळे ते निगेटिव्ह की पॉझिटिव्ह हे समजत नाही. त्यांची स्थिती खालावते.तरी तात्काळ रॅपिड किट उपलब्ध कराव्यात.
कैलास चौधरी, ग्रामपंचायत सदस्य
प्रतिक्रिया–लोहारा येथे कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघता टायफाईड ची लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी रॅपिड टेस्ट करून घ्यावी म्हणजे वेळीच उपचार केले जाऊ शकता, कुठलीही भीती मनात ठेवू नये.
डॉ.केयुर चौधरी,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख भाजपा वैद्यकीय आघाडी