लोहारा ता पाचोरा–(दिपक पवार)–धी शेंदुर्णी सेंक एज्यू को ऑप सोसा लि शेंदुर्णी संस्थे द्वारा संचलित डॉ जे जी पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा ता पाचोरा जि जळगांव विद्यालयाचा एस एस सी मार्च २०२३चा एकूण निकाल ९४.३१ टक्के लागला.
परीक्षेला एकूण १७६विद्यार्थी प्रविष्ट होते पैकी १६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.यामध्ये विशेष प्राविण्य मिळवणारे विद्यार्थी ५० प्रथम श्रेणी मध्ये ७३द्वितीय श्रेणी मध्ये ३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पहिले पाच विद्यार्थी पुढील प्रमाणे प्रथम कु योगिता ज्ञानेश्वर माळी ९३.३०टक्के,द्वितीय कु भावना दिलीप परदेशी ८९.००टक्के, तृतीय यामध्ये दोन विद्यार्थी कु पूर्वा दिलीप परदेशी ८८.००व कल्पेश योगेश चौधरी ८८.०० उत्तीर्ण ,चौथा क्र. कु साक्षी अशोक उशिर ८७.६०, पाचवा क्र यामध्ये दोन विद्यार्थी कु स्वाती लक्ष्मण सोनवणे ८७.००टक्के व कु साक्षी अशोक माळी ८७.००टक्के या प्रमाणे विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
विशेष लोहारा केंद्रात प्रथम क्रमांक कु योगिता ज्ञानेश्वर माळी या विद्यार्थिनिने मिळवला. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे कौतुक व अभिनंदन संस्थेचे चेअरमन संजय भास्करराव गरुड, सचिव सतीश चंद्र काशीद,महिला संचालिका उज्वला काशीद,सहसचिव दिपक गरुड,वस्तीगृहसचिव कैलास देशमुख ,स्थानिक सल्लागार समिती अध्यक्ष भिमराव शेळके, विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक अ अ पटेल, विद्यालयाचे मुख्याध्यापक आर एस परदेशी ,उपमुख्याध्यापक डी एस पाटील, पर्यवेक्षिका सौ यु डी शेळके, दहावीचे वर्गशिक्षक व्ही एम शिरपूरे, वाय पी वानखेडे ,ज्येष्ठ शिक्षक
पी एम सुर्वे ,आर जी बैरागी, एस एस गुजर ,आर सी जाधव, वाय व्ही चौधरी, एन व्ही बोरसे आदी सर्व शिक्षक शिक्षकेतर वस्तीगृह कर्मचारी बंधू-भगिनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे पालक व गावातील व परिसरातील नागरिकांनी केले आहे.
कु.योगिता माळी ही प्रगतिशील शेतकरी व भाऊसो. तु. आ.माळी पतसंस्था संचालक ज्ञानेश्वर माळी यांची कन्या आहे.