प्रतिनिधी |
लोहारा ता पाचोरा–येथून जवळच असलेल्या शहापुरा येथे आज १८ रोजी गणेश रुपचंद परदेशी यांच्या घरातील कडी खोलून अज्ञात-चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश करून त्यांच्या लोखंडी पेटीचा कोंडा उचकटून त्यातील ४६ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने ,आठ भार वजनाचे चांदीचे दागिने तसेच एक लाख रुपये रोख असा ऐवज चोरून नेला आहे.
याबाबत पिंपळगाव हरे पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर १८०/२०२३ भादंवि ४५४,३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार करीत आहेत.
या धाडसी चोरीची माहिती मिळताच पाचोरा डीवायएसपी धनराज येरुळे व पिंपळगाव हरे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांनी घटनास्थळी भेट दिली.या चोरीप्रकरणी एका संशयितास ताब्यात घेण्यात आले असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.